सारथी बहु.संस्थेच्यावतीने विद्यार्थीनीला आर्थिक मदत

0
50

गोंदिया: श्री सारथी बहुउद्देशिय संस्था गोंदियाच्यावतीने तालुक्यातील शिवाटोला (तांडा) येथील एका निराधार विद्यार्थीनीला शैक्षणिक मदतीसाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले. छायाबाई नरेश गौतम यांची मुलगी प्रिया नरेश गौतम हिने १०वीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण घेऊन यश प्राप्त केले. व विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची तयारी सुरु केली,मात्र आर्थिक परिस्थिती अभ्यासक्रमाचा खर्च पेलवणारी  नसल्याने विज्ञान शाखेच्या  प्रवेशात अडचण निर्माण होत होती.ती अडचण बघून श्री सारथी बहुउद्देशिय संस्था गोंदियाच्या पदाधिकार्यांनी ५ हजार रुपयाची आर्थिक मदत करुन सहकार्य केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रेमचंद यशवंतराव टेंभरे, उपाध्यक्ष सचिन भोजराज ठाकरे, सचिव श्रीमती ममता रमेशकुमार राणे, कोषाध्यक्ष सरेीता सुरेश पटले, सदस्य लोकेशकुमार टेंभरे, सोनाली राणे, विनायक सुरजलाल पटले, हरगोविंद चिखलु टेंभरे, टोकेशकुमार मुन्नालाल हरिणखेडे आदि उपस्थित होते.