43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ इटखेडा जिप क्षेत्रात विविध विकासकामांचे भूमिपूजन

इटखेडा जिप क्षेत्रात विविध विकासकामांचे भूमिपूजन

0
18

blank

अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील इटखेडा जिप क्षेत्रात येणार्‍या देऊळगाव बोदरा, तिड़का, ताड़गाव, बोळदे, धाबेटेकडी आदर्श, बुधेवाडा, वडेगाव, इटखेड़ा, ईसापुर, खामखुर्रा, येगाव या गावांत विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते शनिवार, 18 सप्टेंबर रोजी करण्यात आले. या वेळी सर्व  ग्रामपंचायतीला भेट करून गावातील समस्या जाणून घेण्यात आल्या.

सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, राकेश लंजे, उद्धव मेहेंदळे, निप्पल बर्रेय्या, आर.के. जांभुळकर, प्रमोद डोंगरे, दीपक सोनवणे सरपंच धाबेटेकडी, शंकर उइके सरपंच बोदरा-देऊळगाव, बबिता उइके सरपंच तिड़का, अश्विन कोडापे सरपंच इटखेड़ा, संगीता लाडे सरपंच बुधेवाड़ा, मिना लंजे सरपंच बोळदे-करड, रश्मि खूणे सरपंच वडेगाव-रेल्वे, कल्पना करंजे सरपंच इसापुर, अजय अंबादे सरपंच खमखुर्रा, अनिल पालीवार येगाव तसेच इटखेडा जिप क्षेत्राच्या सर्व गावातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

blank