सालेकसा दु.निबंधक कार्यालय बिनकामाचे

0
14

सालेकसा दि. २१:: मागील सहा महिन्यांपासून सॉफ्टवेअरमध्ये बिघाड आल्यामुळे सालेकसा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कोणतीही कामे होत नाही. सध्या हे कार्यालय दिसायला टापटिप आणि केवळ शोभेची वास्तू बनून आहे. दुसरीकडे खरेदी विक्रीसंबधी कोणती नोंदणी करायची असेल तर आमगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात धाव घ्यावी लागते. तेथे नोंदणीकर्त्यांना मोठाच आर्थिक भुर्दंड बसतो.
सालेकसा येथील दुय्यम निबंधक यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितले, रजिस्ट्री (नोंदणी) करणारे साफ्टवेअर मागील सहा महिन्यांपासून बिघडलेले आहे.ते दुरूस्त करण्यासाठी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.परंतु ते आतापर्यंत दुरूस्त करण्यात आले नाही. लोकांची कामे थांबू नये म्हणून येथील सर्व रजिस्ट्रीची कामे आमगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात नेऊन पूर्ण केले जात आहेत.
यामुळे रजिस्ट्री करणार्‍या गरजू लोकांना मोठय़ा प्रमाणात वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे.