देवरीत महाराष्ट्रबंद यशस्वी

0
77

महाविकास आघाडीच्या आवाहनाला जनतेची उत्स्फुर्त साथ

देवरी,दि.11:-केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा मागे घ्यावा, यासाठी देशभर आंदोलने केली जात आहे. या आंदोलनादरम्यान उत्तरप्रदेशातील लखीमपूर खीरी येथे मोदी सरकरामधील एका मंत्र्यांच्या मुलाच्या वाहन ताफ्याने शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली.  या घटनेच्या निषेधार्थ राज्यातीस महाविकास आघाडीने आज (दि.11) रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या हाकेली देवरी तालुक्यातील जनतेने साथ देत आज कडकडीत बंद पाडला. दरम्यान, भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी हा बंद हाणून पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. देवरीमध्ये महाराष्ट्र बंदला महाविकास आघाडीच्या नेतृत्वात काँग्रेस , राका आणि शिवसेना पक्षासह अनेकांनी  आपला पाठिंबा दिला.

भारतीय शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाचा समावेश असणाऱ्या वाहन ताफ्याने चिरडून मारले. या घटनेमुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

देवरी शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने आज बंद ठेवण्यात आली. विशेष म्हणजे काही निवडक भाजप कार्यकर्त्यांनी देवरी शहर बंदला विरोध करण्याचा प्रयत्न केला.  दरम्यान, महाविविकास आघाडी द्वारे शहराच्या प्रमुख मार्गावरून रॅली काढून सदर घटनेचा निषेध करून चिचगड चौकात सभेचे आयोजन केले. यावेळी स्थानिक आमदार सहसराम कोरोटे यांचे सह राष्ट्रवादीचे रमेश ताराम आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील मिश्रा यांनी सभेला मार्गदर्शन करून उत्तरप्रदेशातील क्रूर घटनेवर प्रकाश टाकला. सदर रॅली मध्ये आमदार सहषराम कोरोटे, सुनील मिश्रा, रमेश ताराम, छोटेलाल बिसेन,संदीप भाटिया यांच्या सह सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.