शेतात विहिरीऐवजी बोअरवेल खोदा

0
20

गोंदिया दि. २६: शेतकर्‍यांची परिस्थिती पाण्याअभावी फार गंभीर आहे. वरच्या पावसावर अवलंबून राहणार्‍या शेतकर्‍यांची शेती एका पाण्याअभावी कोरडीच राहते व शेतकर्‍यांवर आर्थिक संकट येतो.
महाराष्ट्र शासनाद्वारे विहिरी बांधून देण्याची योजना आहे. परंतु ही योजना काही ठराविक शेतकर्‍यांसाठी असते. त्यामुळे आता शासनाने विहिरीऐवजी सरळ शेतकर्‍यांच्या शेतात बोअरवेल खोदून द्यावी व त्यावर सर्मसिबल पंप बसवून विद्युत जोडणीसुद्धा करून द्यावी. एका विहिरीची किंमत तीन लाख रूपये असून या किंमतीत तीन शेतकर्‍यांच्या शेतात तीन बोअरवेल्सचे काम होऊ शकते, अशी मागणी भाजपचे जिल्हा महामंत्री दीपक कदम यांनी केली आहे. विहिरींच्या बांधकामाला अधिक खर्च येतो. मात्र तेवढय़ाच रकमेत अनेक शेतकर्‍यांना बोअरवेल्सचा लाभ मिळू शकतो.
पाटबंधारे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणद्वारे शेतकर्‍यांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरमध्ये ते बोलत होते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये उपस्थित नागपूर येथील पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ढवळे यांनी मागणी खरी असून अशा प्रकारच्या प्रस्तावाबाबत चर्चा आयुक्त नागपूर यांच्याशी करावी.
तसेच त्यांच्यामार्फत शासनाकडे सदर प्रस्ताव पाठविण्याची माहिती दिली. सदर शिबिराला जिल्ह्यातील २५0 शेतकरी उपस्थित होते. या वेळी दीपक कदम यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.