राष्ट्रवादीने दिला डाॅ. गुप्ता यांना जेष्ठ नागरिक पुरस्कार

0
14

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १२ ते १९ डिसेंबर २0१५कृतज्ञता सप्ताहात ज्येष्ठ नागरिकांचा (७५ वर्षांच्यावर) सन्मान करण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरविले आहे. त्यानिमित्त गोंदियाचे प्रथम हृदयरोग चिकित्सक डॉ. श्रीश गुप्ता (७९) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. डॉ. गुप्ता १९६३ पासून गोंदियाला हृदयरोग चिकित्सक म्हणून कार्य करीत आहेत. ते जिल्ह्यातील प्रथम डॉक्टर इन मेडिसिन व फेला इंडियन कॉलेज ऑफ कॉर्डीयोलॉजीस्ट आहेत.त्यांनी जीएमए व आयएमएची स्थापना केली. त्याचप्रमाणे लॉयन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी खा.प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या संबंधाची आठवण करुन दिली.