पुलाच्या कामाची गती वाढवा- सार्वजनीक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे

0
5

 

नागपूर दि २४ :- नागपूर येथील १०० वर्ष जुन्या कमानी पुलाच्या ठिकाणी नविन केबल स्टेड पुलाचे बांधकाम सुरू असुन आज सार्वजनीक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यानी पुलाच्या कामाची पाहणी केली. या पुलाचे काम डिसेंबर २०१६ पर्यत पुर्ण करण्यासाठी कामाची गती वाढवा असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिलेत.
यावेळी आमदार सुधाकर देशमुख, विकास डोंगरे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर एल मोपलवार, मुख्य अभियंता एस के चॅटर्जी, अधिक्षक अभियंता यु जी डाबे उपस्थित होत.
रामझुला या पुलाला समांतर असणारा, रेल्वे उड्डाण पुल बांधकामाला केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरूत्थान अभियान योजनेतर्गत मंजुरी प्राप्त आहे. मेसर्स ॲफकॉन इन्फ्रा लिमीटेड ही कंपनी या पुलाचे बांधकाम करीत आहे. बांधकामाची मंजूर सुधारित किंमत ६९ कोटी ६२ लक्ष रूपये आहे. २५ जानेवारी २००६ रोजी या पुलाचे काम सुरू करण्यात आले. पुलाची पोच मार्गासह एकूण लांबी ६०६.७४२ मीटर आहे. केबल स्टेड पुलाची लांबी २०० मीटर आहे. यामधील टप्पा एकचे काम पुर्ण झाले असुन त्या पुलाचे लोकार्पण झाले आहे.
टप्पा दोनच्या कामास सुरूवात झाली असुन पी ७, पी ८ या दोन पियर्स चे बांधकाम भूतल पातळीपर्यत करण्यात आले आहे. जुन्या रेल्वे उड्डाण पुल तोडण्याचे काम प्रगतीत असुन सद्यस्थितीत त्याचा वियरिंग कोट काढण्यात आला आहे. पुलाचे काम पुर्ण होण्याचा नियोजित कालावधी डिसेंबर २०१६ पर्यतअसून काम वेळेत पुर्ण करण्यासाठी कामाची गती वाढविण्याच्या सुचना बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्यात.