व्यक्तीपेक्षा पक्ष तर पक्षापेक्षा राष्ट्र मोठे- कृषीमंत्री बिसेन

0
15

तिरोडा दि. २6 : भारतामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा आणीबाणी जाहीर करुन संबंधित विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले, त्यात अटलबिहारी वाजपेयीसुद्धा होते. त्याचा परिणाम नंतरच्या काळात होऊन काँग्रेस सरकार पडून मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्याच कार्यकाळात अटलबिहारी वाजपेयी विदेशमंत्री झाले. त्यांनी विदेशात आपली छाप उमटविली. व्यक्तिपेक्षा पार्टी मोठी व पार्टीपेक्षा राष्ट्र मोठे असते. राष्ट्रासाठी कार्य करणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे, असे मत मध्यप्रदेशचे कृषी व सहकारमंत्री गौरीशंकर बिसेन यांनी व्यक्त केले.
आ.विजय रहांगडाले यांनी शुक्रवारी तिरोड्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित सुशासन दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
आ.रहांगडाले यांच्या कार्यालयासमोरील पटांगणावर घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात आ.अनिल सोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी मार्गदर्शन करुन वाजपेयी यांच्या राजकीय जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सीता रहांग़डाले, माजी आ.हरिष मोरे, भजनदास वैद्य, खोमेश्‍वर रहांग़डाले, हेमंत पटले, सुनील पालांदूरकर, दिलीप चौधरी, सुरेंद्र बिसेन, जि.प. सदस्य रोहिनी वरखडे, रजनी कुंभरे, पवन पटले, डॉ.बी.एस. रहांगडाले, कृउबासचे डॉ.चिंतामन रहांगडाले, डॉ.वसंत भगत, संजय बैस, रमनिक सोयाम, राणी रहांगडाले, हेमलता पटले हे प्रामुख्याने उपस्थित होते.  आ. विजय रहांगडाले यांनी प्रास्ताविकातून आपल्या विधानसभा क्षेत्रात सिंचन व्यवस्था कशी परिपूर्ण होईल, अडलेला सिंचन प्रकल्प, खळबंदा जलाशय, चोरखमारा जलाशय, बोदलकसा जलाशय यात पाणी कसे टाकता येईल, तसेच पाईपलाईनचे नियोजन बदलवून रस्त्याच्या कडेने नेवून लवकर या योजना पूर्ण केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असे आश्‍वासन यावेळी दिले.
कार्यक्रमाचे संचालन मदन पटले यांनी तर आभार अनुप बोपचे यांनी मानले. यशस्वीतेसाठी खडकसिंग जगने, मोनू भूते, प्रभु सोनेवाने, भाऊराव कठाने, सुनील बन्सोड, तेजराम चव्हाण, शुक्राचार्य ठाकरे, स्वानंद पारधी, पंकज रहांगडाले, चंदाताई शर्मा, थानसिंग रहांगडाले, डॉ. रामप्रसाद पटले यांनी सहकार्य केले.