जनतेचे कल्याण म्हणजेच सुशासन- अग्रवाल

0
9

– माजी पंतप्रधान बाजपेयी यांचे वाढदिवस
– जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांना फळ वितरण
गोंदिया,दि. २6 : माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांच्या कार्यकाळात खèया अर्थाने सुशासनाला सुरूवात झाली. आपल्या कणखर नेतृत्वाने त्यांनी आपल्या कार्यकाळात पंतप्रधान सडक योजना, अंत्योदय योजना अश्या अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून देशातील गरीब, शोषित, पिडीतांचे जीवनमान उंचावून विकासाला सुरूवात केली. त्यांच्या पावलावर पाउल टाकीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्य करीत असून देशाला पुढे नेण्याचे कार्य करीत आहेत. जनतेचे कल्याण म्हणजेच सुशासन असून भाजपा सरकार यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.
ते  २५ डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यालयात शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित सुशासन दिन कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलतांना अग्रवाल म्हणाले की, कार्यकत्र्यांचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान असलेल्या अटलजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा असून ‘छोटे मन से कोई बडा नहीं होता और टूटे मन से कोई खडा नही होताङ्कया कवितेचा ओळी कार्यकत्र्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शहर अध्यक्ष क्षत्रीय व नगराध्यक्ष जायस्वाल यांनीही अटलजींच्या कार्यकाळातील कार्यांची माहिती देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तदनंतर सर्व पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांना फळ व बिस्कीट वितरीत केले. यावेळी प्रामुख्याने जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष भाउराव उके, किशोर हालानी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी, प्रदिपqसह ठाकूर, जयंत शुक्ला, शहर महामंत्री संजय मुरकुटे, अमित झा, सुनिल केलनका, बाबा बिसेन, नगरसेवक बंटी पंचबुद्धे, ऋषीकांत साहू, अभय अग्रवाल, पंकज सोनवाने, लखन हरिणखेडे, महेश चौरे, हरिश चौरसिया, मोहसीन खान, मुकेश हलमारे, सतीश मेश्राम, धनंजय वैद्य, पिल्ले, बसंत गणविर, मंगलेश गिरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.