तिरोडा येथे धर्मकाट्याचे उद््घाटन

0
11

तिरोडा : धर्मकाटा लावणे शेतकर्‍यांच्या दृष्टीने हिताचे असून काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरुन पीकपद्धतीत वाढीव उत्पादन घेतो, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या शेतमालाचे वजन धर्मकाट्याच्या सहाय्याने केल्यास शेतकर्‍यांचा वेळ वाचेल व योग्य मापन होईल, असे मत मध्य प्रदेशचे कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन यांनी व्यक्त केले.
तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे घेण्यात आलेल्या धर्मकाटा उद््घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आ. विजय रहांगडाले होते. त्यांच्याच प्रयत्नाने धर्मकाटा स्थापन करण्यास मुर्तरुप देण्यात आले. प्रशासक मंडळ पदस्थापनेच्या वेळी आ. विजय रहांगडाले यांनी धर्मकाटा तयार करण्याचे वचन दिले होते. त्यावेळी भूमिपूजन आ. अनिल सोले यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता आ. रहांगडाले यांनी आपली वचनपूर्ती करुन धर्मकाट्याचे उद््घाटनही करवून दिले. या वेळी चिंतामन रहांगडाले, संजयसिंह बैस व डॉ. वसंत भगत, खोमेश रहांगडाले, भजनदास वैद्य, भाजपा तालुकाध्यक्ष चतुर्भूज बिसेन, मदन पटले, संदीप अग्रवाल, मधू अग्रवाल, भूषण झरारिया उपस्थित होते. संचालन रा.चं.बैस, प्रास्ताविक संजयसिंह बैस व आभार डॉ. वसंत भगत यांनी मानले.