जलयुक्त शिवार याेजना म्हणजे फक्त पैसा उपसा अभियान: देसरडा

0
7
नागपूर – जलयुक्त शिवार योजना राबवताना शास्त्रशुद्ध पद्धतीचा विचारच झाला नाही. त्यामुळे हे पैसा उपसा अभियान ठरले असून, कागदावरच यशस्वी ठरल्याचा आरोप राज्य नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. एच. एम. देसरडा यांनी नागपुरात बोलताना केला.
या योजनेत निवडलेल्या पाच हजार गावांत जलसंचयाची कामे झाल्याचा दावा राज्य शासनाकडून होत असला तरी ती अंमलात आणताना कुठेही शास्त्रशुद्ध पदतीचा विचारच झाला नाही, अशी टीका करून देसरडा यांनी योजना यशस्वी झाल्याचा अहवाल दाखवण्याचे आव्हान राज्य शासनाला दिले. या योजनेच्या माध्यमातून निधीची लूट झाली २४ टीएमसी पाणीसंचय करण्याचा दावा राज्य शासन करते आहे. किमान १०० गावातील यश तरी दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले. या योजनेच्या माध्यमातून पैशांची लूट झाली, असा आरोप देसरडा यांनी केला.