Pathankot: एअरबेसवर ऑपरेशन सुरु

0
9
वृत्तसंस्था
पठाणकोट, दि. ४ – येथील हवाई दलाच्या तळावर अतिरेक्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईचा आज तिसरा दिवस आहे. अजूनही कारवाई संपलेली नसून, कारवाई अंतिम टप्प्यात असल्याची माहिती एनएसजीच्या अधिका-यांनी दिली आहे.  दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्‍यास आम्‍हाला यश मिळाले. आता ऑपरेशन अंतिम टप्‍प्‍यात आहे, अशी माहिती सैन्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 एअरबेसवरील हवाई दलाचे कर्मचारी रहात असलेल्या एका इमारतीमध्ये  हे अतिरेकी असून, तिथे त्यांना घेरण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली.

पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर सुरु असलेली मोहिम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला असून, अजून दोघांविरोधात कारवाई सुरु आहे
पठाणकोट येथील हवाई दल तळाच्या आतमध्ये रहाणारी सर्व कुटुंब सुरक्षित आहेत
पठाणकोट येथील हवाई दल तळाचा परिसर खूप मोठा आहे, शोधमोहिम सुरु आहे, अजून बराचवेळ शोध मोहिम सुरु रहाण्याची शक्यता.
पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावरील अतिरेक्यांविरोधात एनएसजी आणि गरुडा कमांडो संयुक्तपणे कारवाई करत आहेत.
 पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावरील विमानांना लक्ष्य करण्याचा अतिरेक्यांचा इरादा होता मात्र सर्व विमाने सुरक्षित आहेत