आज पत्रकार दिनानिमित्त चर्चासत्र

0
8

गोंदिया,दि.५ : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे आद्यजनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण नावाचे पहिले मराठी साप्ताहिक सुरु केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज पत्रकार दिनानिमित्त श्रमिक पत्रकार संघ गोंदिया, जिल्हा मराठी पत्रकार संघ, प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया, लघु वृत्तपत्र संपादक संघ, गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त वतीने विश्रामगृह येथे दुपारी २.३० वाजता ‘प्रसारमाध्यमे व विकासङ्क या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर हे करतील. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे व प्रमुख वक्ते म्हणून नाबार्डचे सहायक महाप्रबंधक मिलिंद कंगाली, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर उपस्थित राहणार आहेत. पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.