दारूबंदीसाठी कुु्ुुर्हाडी ‘बंद’,नाईलाजास्तव पोचले दारुबंदीविभागाचे अधिकारी

0
6
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या कुNहाडी येथे दारूबंदीसाठी सरपंचासह दोघे १ जानेवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. दरम्यान आज चौथ्या दिवशी ग्रामस्थांनी त्यांच्या आंदोलात उडी घेवून शाळा, महाविद्यालय व            व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून दारूबंदी मागणी लावून धरली. अखेरीस प्रशासन जागे झाले व चोख पोलीस              बंदोबस्तात लेखी आश्वासनानंतर उपोषणकत्र्यांनी उपोषण मागे घेतले.
आदर्श गाव असलेल्या कुNहाडी येथे गेल्या काही वर्षात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय फोफावत गेला. यामुळे मद्यपींची संख्येत वाढ होऊन गावातील वातावरण दुषित होउâ लागले. त्यामुळे दारूबंदीसाठी सरपंच संजय आमदे यांनी संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु, तक्रार, निवेदने देवूनही दारूबंदी होत नसल्याचे पाहून त्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत दारूबंदी न झाल्यास १ जानेवारीपासून उपोषणावर बसण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यानंतरही प्रशासनातर्फे कोणतीच हालचाल झाली नाही. त्यामुळे सरपंच संजय आमदेसह उपसरपंच सुनील लांजेवा व मंगेश रहांगडाले हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले.
दरम्यान, तीन दिवस एकाही अधिकाराने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. परिणामी या आंदोलनात सहभाग घेवून               दारूबंदीसाठी ग्रामस्थांनी  ४ जानेवारी रोजी शाळा, महाविद्यालय व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली. उपोषणकर्ते व ग्रामस्थांची भूमिकेची धडकी घेवून प्रशासनातले अधिकारी जागले. कडक पोलीस बंदोबस्तात उपविभागीय पोलीस अधिकारी, राजस्व विभाग, जिल्हा परिषद पदाधिकारी व पोलीस विभागाचे अधिकारी उपोषणस्थळी पोहोचले आणि दारूबंदीचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर जि. प. सभापती पी. जी. कटरे यांनी िंलबूपाणी पाहून उपोषणकत्र्यांचे उपोषण सोडविले. दरम्यान तीन उपोषणकत्र्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.