सोनी येथे महात्मा फुले जयंती कार्यक्रम

0
21

गोरेगाव ता.12:-‌ तालुक्यातील मणीभाई ईश्वरभाई पटेल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय सोनी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती चा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बी. ए. जांगडे सर होते, तसेच वरिष्ठ शिक्षक जे. एम. बागडे, एस.एस.शहारे, प्रा. डि. एस. बिसेन, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम प्रतिमेच्या स्वरुपात असलेले महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी एस. एस. शहारे सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बी. ए. जांगडे सरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन ए. के. बिसेन सर व आभार प्रदर्शन पी.एस.राठोड सरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.