नाला खोलीकरण कामाचे भुमिपूजन

0
41

गोरेगाव- तालुक्यातील सोनी जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्राम पंचायत झांजिया येथे ११ एप्रिल रोजी जि. प. सदस्य पंकज रहांगडाले यांच्या हस्ते महात्मा गांधी रोजगार हमी योजना अतंर्गत नाला खोलीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमात ग्रा. पं. सरपंच उषा दिहारे, संजू कटरे, सुनिता पटले, सुनील साठवणे, लिल्हारे, रोशन कटरे, व्यंकट बिसेन, पुरनलाल शरणागत रोजगार सेवक व समस्त गावकरी उपस्थित होते. याप्रसंगी जि. प. सदस्य पंकज रहांगडाले यांनी शासनाच्या योजनेतून होणार्‍या कामात मी सदैव तत्पर राहुन कोणत्याही प्रकारचे अडथडा निर्माण होणार नाही, महाराष्ट्र सरकारने प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेचे काम जोमाने सुरू करावे, जेणेकरून शेतमजूरांच्या हाताला काम मिळेल. नाला खोलीकरणाच्या कामाने पाणी साठवणुकीची क्षमता वाढणार असून, शेतीसाठी पाण्याची पुरक व्यवस्था होईल, असेही जि. प. सदस्य पंकज रहांगडाले यांनी व्यक्त केले.