पोलिस पाटील संघटनेकडून पोलिस पाटलाच्या परिवाराला आर्थिक मदत

0
32

गोंदिया- तालुक्यातील दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या नवेगाव येथिल पोलिस पाटील रामचंद्र धाडुजी बघेले यांचे १२ एप्रिल रोजी आकस्मिक निधन झाले. घरचा कर्ता पुरुष निघून गेल्याने परिवारावर आर्थिक संकट कोसळले. पोलिस पाटलांना सेवानवृत्ती वेतन नसल्याने व अशा अचानक घडणार्‍या घटनेवेळी आणि घरची परिस्थिती बेताची असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे आर्थिक मदत व्हावी, यासाठी पोलिस पाटील संघटनेकडून पोलिस पाटलाच्या परिवाराला आर्थिक मदत करण्यात आली.
गाव कामगार पोलिस पाटील संघटना उपशाखा दवनीवाडाच्यावतीने मृतक रामचंद्र बघेले यांच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपये रोख देण्यात आले. व मृतक पोलिस पाटलाबद्दल शोक संवेदना व्यक्त करून सहानुभूतीपूर्वक र्शद्धांजली अर्पण करण्यात आली.
पोलिस पाटील संघटना दवनीवाडा शाखेचे अध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा संघटक कुन्जीलाल भगत यांचे नेतृत्वाखाली राजू कडव, झनकसिंह लिल्हारे, लोकचंद बिजेवार, राजू ठाकरे, पुस्तकला चौरे, शालू डोंगरे, गोंदिया जिल्हा पोलिस पाटील संघटनाचे कार्याध्यक्ष प्रवीण कोचे, सहसंघटक रवींद्र बिसेन, विनोद नंदेश्‍वर, अशोक पटले, नितीन बघेले, दिनेश कडिनाहके व अन्य सर्व पोलिस पाटील उपस्थित होते.