झेंडा काढण्याच्या कारणावरून अचलपुरात गोटमार, अतिरिक्‍त पोलीस बलासह पोलीस अधीक्षक शहरात दाखल

0
34

अमरावती- जिल्ह्यातील अतिसंवेदनशील शहर म्हणून म्हणून परिचित असलेल्या अचलपूर येथे रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास झेंडा काढण्यातचा झालेला वाद विकोपाला गेल्याने गोटमार झाल्याने शहरात संचारबंदी लावण्यात आली असून सुमारे वीस ते बावीस लोकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी दिली आहे.

अचलपूर शहरातील प्रवेशद्वार असलेल्या खिडकी गेट आणि दुल्हा गेट येथील ऐतिहासिक मोठ्या दरवाजांवर दरवर्षी सण-समारंभ प्रमाणे विविध धर्माचे झेंडे लागतात. मात्र का रात्री बाराच्या सुमारास काही असामाजिक तत्वांनी येथील झेंडा काढलाने वाद निर्माण झाला काही काळात वादाचे रूपांतर गोटमार झाली. मध्यरात्री शहर निद्रिस्त नसताना झालेला हा वाद विकोपाला जाण्यापूर्वीच एस आर पी व स्थानिक पोलिसांनी मिळून हा वाद

नियंत्रणात आणला यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या कांडा सुद्धा फोडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना अचलपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गरुड म्हणाले की, अचलपुरात दोन गटात झालेला वाद विकोपाला जाण्याच्या पूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरात रात्रीपासून जमाबंदी सुरू करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.