आमदार चंद्रिकापुरेंच्या हस्ते माहुरकुडा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

0
34

अर्जुनी मोरगाव,दि.१८ः- तालुक्यातील ग्रामपंचायत माहुरकुडा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत गावातील ५० लक्षाचे सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे बांधकांमाचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते करण्यात आले.

संपूर्ण मतदारसंघाचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत.गावातील रस्ता उत्तम आणि दर्जेदार राहील यासाठी माझे विशेष लक्ष आहे. जलदगतीने काम पूर्ण करण्याच्या सुचना आमदार यांनी संबंधीताना दिल्या.

यावेळी कविताताई कापगते जि.प सदस्य, सरीताताई कोडापे प स सदस्य,नरेश नाकाडे सरपंच, उज्वलाताई डोंगरे उपसरपंच, प्रमोद राऊत उपअभियंता, संघदीप भैसारे, अजय शहारे, किशोर तागडे, अल्काताई पंधरे, स्मिताताई पाटणकर, नलु नाकाडे, घनश्याम येरणे, ज्ञानेश्वर पाटणकर, शामराव नाकाडे, अंबुजी नाकाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.