मुंडीपार व कोहका शाळेत शाळा पुर्व तयारी कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन

0
36

गोंदिया,दि.18ः- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोहका(भानपूर) येथे शाळा पुर्व तयारी “” बाल मेळावा 2022 “” कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांचे शालेयपयोगी प्रात्याक्षिक घेण्यात आले.कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पटले, सरपंच अर्चना कंसरे,ग्रां.पं.सदस्या अनिता राहांगडाले,जि.प.शिक्षणाधिकारी प्राथ.महेंद्र मोटघरे,जि.प.विस्तार अधिकारी श्री.दिघोरे,भानपुर केंद्रप्रमुख सौ.पडोळे (खोब्रागडे ),अपंग समावेशीत शिक्षिका मंजुषा खोब्रागडे,शांताबाई पाचे,सतिश अग्रवाल उपस्थित होते.यावेळी शालेय शिक्षकवृंद, स्वयंसेवक माजी विद्यार्थिनी, आंगणवाडी शिक्षिका व मदतनिस व नवागत दाखलपात्र बालकांसह मातापलक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन शिक्षक विनोद चन्ने यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक लिकेश हिरापुरे यानी केले.आभार प्रदर्शन शिक्षक राजेश बिसेन यानी केले.अंगणवाडी सेविका देवबाई नागपुरे आणि सयंसेविक खुशबू , दिव्या, ममता , पूनम, सुरेखा व शालेय मंत्रिमंडळ यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

मुंडीपार शाळेत शाळापुर्व तयारी मेळावा
गोरेगांव:- मुंडीपार येथील केंद्रिय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या वतीने18 एप्रिलला वर्ग पहिलीला दाखल पात्र बालकांसाठी ‘स्टार्स’ प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाची गावात प्रभातफेरी काढुन घोषणा देत अंमलबजावणी करण्यात आली.
मागील दोन वर्षांपासून कोविड19 च्या प्रकोपामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाल्याने पूर्व प्राथमिक शिक्षण देणारे अंगणवाडी केंद्रदेखील बंद होते.त्यामुळे यावर्षी इयत्ता पहिलीत दाखल होणारे बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण काहीही झालेले नाही.त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू होण्यापूर्वी शिक्षणाची आनंददायी पद्धतीने पूर्व तयारी करून घेण्यासाठी हा अभियान मुंडीपार येथील जिल्हा परिषद शाळेत मेळाव्याच्या स्वरुपात घेण्यात आला.
शाळापूर्व तयारी अभियानात सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राम मुंडीपारचे सरपंच सुमेंद्र धमगाये यांनी केले आहे.सरपंच, उपसरपंच, आजी माजी तंमुस अध्यक्ष,मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालकवर्ग यांच्या उपस्थितीत
सदर मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.