अपघातात महिलेचा मृत्यू,बटाना शिवारातील घटना

0
89

गोंदिया, ता.18-  ग्रामीण पोलीस ठाणेतंर्गत रविवारी (ता.17) सायंकाळी झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बटाना शिवारात घडली. ललिता किरण गेडाम (वय 50) असे मृत महिलेचे नाव असून ती तालुक्यातील छिपिया येथील रहिवासी आहे.
ललिता हि रविवारी आपल्या घरून आंभोरा येथे भावकडे आयोजित लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी म्हणून अनोळखी इसमाच्या दुचाकीवर बसून निघाली होती. परंतु ती आंभोरा येथे न पोहचता बटाना शिवारातील बटाना-मुंडीपार मार्गावर मृतावयस्थेत आढळली.सदर दुचाकी चालकाची अजूनही ओळख पटली नसून सदर महिलेजवळ असलेले रोख दहा हजार रुपये आणि दागिने बेपत्ता असल्यामुळे महिलेचा अपघात नसुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप मृतकाच्या घरील मंडळींनी लावला आहे.सदर दुर्घटना अपघात की हत्या याविषयी परिसरात चर्चेला उधाण आले असून सदर घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली असून पुढील तपास ग्रामीणचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे हे करीत आहेत.