सालेकसा वनक्षेत्रात आगप्रतिबंधक कामात गैरव्यवहार

0
15

सालेकसा वनक्षेत्रातील तक्रारीकडे डीएफओचे दुर्लक्ष

गोंदिया,दि.१२-गोंदिया उपवन सरक्षंकविभागातंर्गत येणाèया गंगाझरी व सालेकसा वनपरिक्षेत्रात आगप्रतिबंधक रेषा(फायर लाईन)तयार करण्याच्या कामात बोगस मजुरांचा करून शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणाची सविस्तर माहिती उपवनसरंक्षकांना लेखी तक्रारीद्वारे माहिती अधिकार कार्यकर्ते पुरण उके यांनी केल्यानंतरही त्यावर कारवाई न करता दुर्लक्ष केले गेले.त्यामुळे अखेर ज्या मजुरांच्या नावे बोगस स्वाक्षरी करून पैशाची उचल करण्यात आली त्या गोqवदटोला येथील मजुरांनी गंगाझरीचे वनपरिक्षेत्राधिकारी व इतराविरुध्द गंगाझरी पोलीस ठाण्यात (दि.१०)तक्रार दाखल केली.ती तक्रार दाखल करीत चौकशीसाठी पोलिसांनी माहिती अधिकार कायद्यातंर्गत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला आहे.
गंगाझरी पोलीस ठाणेतंर्गत येणाèया गोqवदटोला येथील शिवाजी किरसान या इसमाने (दि.१०)गंगाझरी पोलिसात तक्रार नोंदवत आपले नाव वापरून बोगस स्वाक्षरी करून मजुरीची उचल केल्याचे म्हटले आहे. या तक्रारीत बिटरक्षक बी.बी.सोनेकर,क्षेत्रसहाय्यक एस.बी.दुर्रानी व वनक्षेत्राधिकारी एस.के.चाटी यांच्याविरुद्ध ही तक्रार दाखल झाली आहे.याप्रकरणात येथील उपवनसरंक्षकांना या आदीच तक्रार देण्यात आली होती,परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.तक्रारीत १६ फेबुवारी २०१५ ते २८ फेबुवारी २०१५ या कालावधीत गैरअर्जदारांनी शिवाजी किरसान यांच्या खोट्या नावाचा वापर करून व खोटी स्वाक्षरी करून ३४७७.५० पैशाची उचल केली.यावर आरटीआय कार्यकर्ते पुरण उके यांनी तपासणी केली असता आपण कामावर कधीच गेलो नसल्याचे व आपली स्वाक्षरी खोटी असल्याचे सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.आरटीआय कार्यकर्ते उके यांनी केलेल्या तक्रारीत १ लाख ९५ हजार रुपयाची उचल करण्यात आली असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ६ जानेवारी रोजी पुराव्यानिशी केली होती.जे गावात पाटील म्हणून ओळखले जातात आणि सधन आहेत त्यांची नावे मजुरांच्या यादीत घालून आणि त्यांच्या नावे पैसे काढून वनविभागाने फायर लाईन कामात कशाप्रकारे गैरप्रकार होते याचे उदाहरणच समोर आणले आहे
गंगाझरी वनपरिक्षेत्रातील प्रकरणासारखेच सालेकसा वनपरिक्षेत्रातही फायर लाइनच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.१ जानेवारी ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत करण्यात आलेल्या आगप्रतिबंधक जाड रेषा कामावर ज्यांनी कधीच काम केले नाही.अशा मजुरांची नावे वापरून व खोट्या स्वाक्षèया करून वनरक्षक एस.एल.पांडे,क्षेत्रसहाय्यक पि.एस.मेंढे यांनी १२ हजार ४३ रुपयाची उचल रामाटोला येथील कामात केली.त्याचप्रमाणे दर्रेकसा येथील कामात वनरक्षक एम.व्ही.शामकुवर व क्षेत्रसहाय्यक पी.एस.मेढे यांनी १२ हजार ४३,दल्लीटोला येथील कामात वनरक्षक एस.आर.सोनवाने व क्षेत्रसहाय्यक पि.एस.मेंढे यांनी १५ हजार ४८३ व ३० हजार ९६७.चांदसुरज येथील कामात सुद्दा १९ हजार,धनेगाव येथील कामात वनरक्षक एन.टी.मुनेश्वर व क्षेत्रसहाय्यक पि.एस.मेंढे यांनी १८ हजार ६७३ व ३७ हजार २७५ आणि २५ हजार ८०६रुपये.वनरक्षक एस.आर.घेरे व क्षेत्रसहाय्यक डी.एम.गोरे यांनी १० हजार ३२२ व ५ हजार १६१ रुपयाची उचल जमाकुडो येथील कामात केली.नवाटोला येथील कामात क्षेत्रसहाय्यक सी.जी.मडावी यांनी ३७ हजार २७५,शंकरटोला येथील कामात वनरक्षक एस.आर.उके व क्षेत्रसहाय्यक एस.एल.भुते यांनी ३ हजार ४४१ आणि साखरीटोला येथील कामात वनरक्षक एस.आर.येटरे व क्षेत्रसहाय्यक ई.सी.कापसे यांनी १८ हजार ६३७ रुपयाची उचल खोटे मजुरांच्या स्वाक्षèया करून केल्याची लेखी तक्रार आरटीआ़य कार्येकर्ते पुरण उके यांनी केली आहे.ही सर्व माहिती त्यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत वनविभागाकडूनच मिळाली असून संबधितावर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.विभागाने कारवाई न केल्यास ज्यांच्या नावाने बोगस नाव वापरून स्वाक्षरी करून पैशाची उचल करण्यात आली त्या सर्व मजुरांना घेऊन पोलिसात या सर्वाविरुध्द तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.