तालुकाध्यक्षपदी प्रमोद संगीडवार यांची दुसऱ्यांदा निवड

0
11

 

श्री. संगीडवार यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना माजी आम. हेमंत पटले. महामंत्री अंजनकर आणि प्रवीण दहीकर

देवरी- भारतीय जनता पक्षाच्या देवरी तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते प्रमोद संगीडवार यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली.

तालुका अध्यक्षांची निवड करण्याकरीता भाजपच्या स्थानिक पक्ष कार्यालयात आज पक्ष कार्यकर्त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्य़क्षस्थानी पक्षाचे निवडणुक निर्वाचन अधिकारी माजी आमदार हेमंत पटले होते.  यावेळी जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, देवरी पंचायत समितीच्या सभापती देवकी मरई, जि.प. सदस्य सरिता रहांगडाले, दलित आघाडीचे सुखचंद राऊत,  पं.स. सदस्य महेंद्र मेश्राम, देवरीचे नगरसेवक प्रवीण दहीकर, यादवराव पंचमवार, संतोष तिवारी, कौशल्या कुंभरे, कांता भेलावे,संजय ऊइके, कोकिळा दखणे, लक्ष्मण नाइक, लक्ष्मण सोनसर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पंक्षाच्या अध्यक्षपदासाठी प्रमोद संगीडवार यांचे एकमेव नाव असल्याने त्यांची दुसऱ्यांदा देवरी भाजप तालुका अध्यक्षपदी निवड करण्र्यात आली. श्री. प्रमोद संगीडवार यांच्या नेतृत्वात देवरी भाजपने नेत्रदीपक प्रगती केल्याने पक्षाने त्यांचेवर विश्वास ठेवत त्यांच्या हातात देवरी तालुक्याची सूत्रे दिली.

यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी श्री. संगीडवार यांचे अभिंनंदन केले. श्री. संगीडवार यांनी पक्षाने आपल्यावर देवरी तालुक्याची जबाबदारी टाकल्याने त्यांनी पक्षाचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. यापुढे ही  तालुक्यात पक्षाची उंची वाढविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची कबूली त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.  संचालन कुलदीप लांजेवार यांनी केले. उपस्थितांचे आभार दिनेश भेलावे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.