सडक/अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात आ.चंद्रिकापूरेंच्या हस्ते आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन

0
35

सडक अर्जुनी,दि.१८ः- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त जिल्ह्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आज सोमवारला येथील ग्रामीण रुग्णालयात या भव्य तालुका आरोग्य मेळावाचा उद्घाटन आमदार मनोहर चांद्रिकापुरे यांचा हस्ते करण्यात आले.यावेळी तालुक्यातील गावखेड्यातून आलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.

या मेळाव्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर / गोंदिया येथील सर्व तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची वैद्यकीय तपासणी व रोगनिदान करून औषधोपचार केले.सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा व आपले रोगाचे निदान करून औषधोपचार करून घ्यावे असे आवाहन करीत राज्य सरकारच्यावतीने जनहितासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती आमदार चंद्रिकापुरे यांनी दिली.मेळाव्याला नगराध्यक्ष तेजराम मडावी,वंदना डोंगरवार उपाध्यक्ष,महेंद्र वंजारी बांधकाम सभापती, डॉ. भुमेश्वर पटले जि.प.सदस्य,डॉ.नितीन वानखेडे जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.अमरीश मोहबे जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. हर्षवर्धन मेश्राम तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. स्वर्णा हुबेकर, डॉ. जयंती पाटील, डॉ.विनोद भुते,शशिकला टेभूर्णे नगरसेविका, अश्लेश अंबादे नगरसेवक, चेतन वडगाये प.स सदस्य, शालिंदर कापगते प.स सदस्य,तसेच नागरिक उपस्थित होते.