चंद्रपूर मनपातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाचा समारोप

0
17
चंद्रपूर -अग्निशमनचे कार्य करताना प्राणाची आहुती देणाऱ्या अग्निशमन सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी १४ एप्रिल हा दिवस ‘भारतीय अग्निशमन दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर १४ ते २० एप्रिल दरम्यान आगीच्या धोक्यासंबंधात जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुचनेनुसार दरवर्षी १४ ते २० एप्रिल या कालावधीत ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येतो. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने आयोजित सेवा सप्ताहाचा समारोप आज बुधवार, दिनांक २० एप्रिल रोजी पार पडला. याप्रसंगी पाण्याची टाकी, प्रियदर्शनी चौक येथून जटपुरा गेट ते छोटा बाजारपर्यंत अग्निशमन वाहनाद्वारे रॅली काढण्यात आली.
 
या सप्ताहाच्या समारोपप्रसंगी अग्निशमन विभागाच्या कार्यालयात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे फायर ऑफिसर श्री. खरवडे, जूनियर फायर ऑफिसर श्री. राठोड जूनियर फायर ऑफिसर श्री. मानगुडधे, जूनियर फायर ऑफिसर  श्री. आंबोरे, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख चैतन्य चौरे यांच्या हस्ते अग्निशमन शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी अग्निशमन प्रार्थना देखील करण्यात आली. पाहुण्यांच्या स्वागत सोहळ्यानंतर अग्निशमन विभागामार्फत फायर डेमॉन्स्ट्रेशन करण्यात आले. उपअग्निशमन अधिकारी तुंबेकर यांनी मार्गदर्शन केले. आगीपासून निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता व उपाययोजना बाबत जनजागृती व अग्निशमन यंत्रणेची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र वाकडे यांनी केले तर आभार मोनीत  येरेवार यांनी मानले. याप्रसंगी अंकुश धोपटे, अनिल महातो व समस्त अग्निशमन विभागाचे कर्मचारी उपस्थीत होते.