सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी माजी मंत्री राजकुमार बडोले यांची नियुक्ती

0
133

सडक अर्जुनी:(२० एप्रिल)-भारत सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा विभागाच्या अंगीभूत असलेल्या सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) या केंद्रीय पब्लिक सेक्टर कंपनीच्या अशासकीय संचालकपदी राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितिन गडकरी,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना दिले आहे.