भोंग्यांबाबत निर्णय घेण्याआधी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करणार, राज ठाकरेंनाही बोलावणार – वळसे पाटील

0
16

राज्यात लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीबाबतत पोलीस महासंचालक यांनी आढाव घेतला आहे. त्याबाबतचा अहवालदेखील दिला आहे. याबाबत काय तयारी केली आहे याची देखील माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यांत कायदा आणि सुव्यस्स्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, माझी विनंती आहे कायदा हातात घेऊ अन्यथा कठोर कारवाई करू असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, हा प्रश्न नवीन नाही. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काही निर्णय दिले आहेत. त्याअनुषंगाने सन 2015 आणि 2017 मध्ये राज्य सरकारने काही आदेश काढले आहेत. याबाबत लाऊडस्पीकरबाबत काय भूमिका असावी हे नमूद करण्यात आले आहे.  गृह खात्याकडे विविध ठिकाणी वाद घडवून आणण्याबाबतचे प्रयत्न सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगाने मी पोलिसांना आदेश देण्यात आले असून त्यांचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले

सर्वपक्षीय बैठक घेणार

लाऊडस्पीकर बाबतच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी लवकरच सर्व प्रमुख विरोधी पक्षाचे नेते, राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेणार असल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले. या बैठकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनादेखील बोलवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वपक्षीय बैठकीनंतर काही संघटनांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी म्हटले.