35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ तेढा येथे पांदन रस्ता बांधकामाचे जि.प.सदस्य भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

तेढा येथे पांदन रस्ता बांधकामाचे जि.प.सदस्य भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

0
33

blank

गोरेगांव,दि.21:-तालुक्यातील ग्रामपंचायत तेढा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत भीमराव शाहारे ते एवन शाहारे यांच्या शेतापर्यंत पांदन रस्ता बांधकामाचे जिल्हा परिषद सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आले. सदर कामासाठी अकुशल निधी 4 लाख 67 हजार 992 रुपये
व कुशल निधी 31 हजार 920 रुपये असा एकूण 4 लाख 99 हजार 912 रुपयाच्या निधीतून हा पांदन रस्ता तयार होणार आहे.यावेळी माजी समाज कल्याण सभापती कुसन घासले, पंचायत समिती सदस्य रामेश्वर महारवाडे, सरपंच राजेश पंधरे, उपसरपंच नरेश कोहळे,ग्रामपंचायत सदस्य सरिता पडोळे,सचिव एस.एस. कटरे मॅडम, ग्राम रोजगार सेवक रूपचंद उईके, माजी सरपंच रमेश वाघमारे, माजी उपसरपंच टेकचंद सांगोळकर, महावितरण ऑपरेटर कुवर भंडारी, प्रतिष्ठित नागरिक ओमप्रकाश राऊत, दिलीपकुमार वाघमारे, गेंदलाल औरासे व गावातील प्रतिष्ठित नागरिक,
मजूर वर्ग इत्यादी उपस्थित होते.

blank