जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत प्रदर्शनीचे आयोजन

0
47

गोंदिया,दि.२१ : आजादी का अमृत महोत्सव वर्षानिमीत्त आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित तालुकास्तरीय मोफत आरोग्य शिबीर २० एप्रिल २०२२ रोजी ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे आयोजित करण्यात आले. सदर शिबिरात किटकजन्य आजाराबाबत माहिती देण्यासंदर्भात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.

        सदर प्रदर्शनीत हिवतापाविषयी सखोल माहिती देणारे फलक लावण्यात आले व हिवतापास कारणीभूत असणारे घटक व त्यावर उपाययोजना जसे की, गप्पी मासे शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बांधणे, साचलेल्या पाण्यात जळालेले इंजिन ऑईल टाकणे यासारखे प्रात्यक्षिक करुण दाखविण्यात आले.

        सदर प्रदर्शनिस श्रीमती आनंदा वाडीवा जि.प.सदस्य काटी, श्रीमती वंदना रहांगडाले सरपंच रजेगांव, कु. वैशाली पंधरे जि.प.सदस्य कामठा,सोनूला बरेले प.स.सदस्य मोगर्रा, शिवलाल जमरे पं.स.सदस्य बनाथर, श्रीमती जितेश्वरी रहांगडाले पं.स.सदस्य काटी तसेच डॉ.अमरिश मोहबे जि.श.चिकित्सक गोंदिया, डॉ.नितीन वानखेडे जिल्हा आरोग्य अधिकारी, दिलीप खोटेले खंडविकास अधिकारी गोंदिया, डॉ. वि.डी.जायस्वाल निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ.सुप्रीया बोरकर वैद्य.अधिक्षक ग्रा.रु. रजेगाव, डॉ. सलिल पाटील, डॉ. गूजर, डॉ. अमर खोब्रागडे यांनी भेट दिली.

         सदर प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी दिलीप कुमरे जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक, डॉ.विलास सिरसाट सामुदायीक आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आशिष बले, पंकज गजभिये, ठाकूर, प्रविण डोंगरे, मयूर कांबळे, रविंद्र बिसेन, श्री जायभाये यांनी परीश्रम घेतले. सदर प्रदर्शनास जनतेचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. याबद्दल जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी जनतेचे आभार मानले.