आरोग्य मेळाव्यात डॉ हुबेकर यांची नेत्रदान जनजागृती

0
15

तिरोडा,दि.27 -केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक ब्लॉक मध्ये भव्य आरोग्य मेळाव्यात चे आयोजन केले होते. या मेळाव्यांच्या माध्यमातून डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी नेत्रदानाविषयी मार्गदर्शन करून जनजागृती करण्याचे कार्य केले.

 गेल्या 18 एप्रिल पासून 26 एप्रिल पर्यंत हे आरोग्य महामेळावा ग्रामीण हॉस्पिटल मध्ये जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आले होते. या  आरोग्य मेळाव्यात सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते
प्रत्येक इच्छुक नागरिकांनी महा मेळाव्यात नेत्रदान संमतीपत्र भरून घ्यावे असे आवाहन डॉ सुवर्णा हुबेकर यांनी या प्रसंगी केले. या वेळी जि प सदस्य माधुरी रहांगडाले यांनी स्वतः आपला नेत्र दानचा फॉर्म भरून मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. यावेळी नेत्रदान बाबत च्या महितीपत्रकाची प्रसिद्धी तुमेश्वरी बघेले यांच्या हस्ते करण्यात आले
नेत्र समुपदेशिका भविका बघेले यांनी नेत्रदाना बाबत माहिती दिली. डॉ सुवर्ण हुबेकर यांनी नेत्रदानाबाबत गैरसमज दूर केले
नेत्रदान च्या या स्टॉल ला तिरोडा शहरातील अनेक लोकांनी गर्दी केली होती
सर्व जेष्ठ नागरिकांना डॉ सुवर्णा हुबेकर यांनी नेत्रदान संकल्प पत्र भरून देण्याचे आवाहन केले
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नितीन वानखेडे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आंबरीश मोहबे यांच्या नेतृत्वात महा मेळाव्यात नेत्रदानावर व्यापक जनजागृती करण्यात आली