मुकाअच्या अधिकारावर अतिमुकाअचा घाला,काढले सेवा संलग्नतेचे आदेश

0
138

गोंदिया,दि.04ः  जिल्हा परिषदेत अनेकदा सावळागोंधळ चालल्याचे प्रसारमाध्यमांनी समोर आणले आहे.आता यातच 22 एप्रिल रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आस्थापनेसंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार नसतांना त्या अधिकाराचा वापर करीत सालेकसा पंचायत समितीमधील एका कर्मचार्याची सेवा संलग्नंता तात्पुरत्या स्वरुपात कामाचा ताण असल्याचे कारण पुढे करुन केल्याचे समोर आले आहे.                                                          सविस्तर असे की,जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाच आस्थापनासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आहेत.तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्याकडे येत असलेल्या विभागांच्या योजनांचे कार्यान्वन करणे आणि देखरेख ही जबाबदारी असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कृषी विभागातील विस्तार अधिकारी एस.के.धमगाये हे सेवानिवृत्त होत असल्याने आणि योजनांच्या कामाचे दोन पद रिक्त असल्याने त्या योजनाचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी सालेकसा येथील विस्तार अधिकारी कु.के.के.तिराले यांची सेवा सलंग्नता तात्पुरत्या स्वरुपात करण्याचे आदेश काढल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.सेवा संलग्नतेचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे असताना त्यांना डावलून हा आदेश निघाल्याची चर्चा आहे.यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडे विचारणा केली असता आमच्याकडे या प्रकरणातील कोणत्याही प्रकारची नसती आली नसल्याचे सांगितले,यावरुन सदर आदेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयातून परस्पर काढल्याचे दिसून येत आहे.