नवनियुक्त उपमुकाअ खामकरांचे ग्रामसेवक युनियनने केले स्वागत

0
64

गोंदिया,दि.04ः- गोंदिया जिल्हा परिषदेचे नवनियुक्त पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी.आर.खामकर यांचे गोंदिया जिल्हा ग्रामसेवक युनियनच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच यावेळी युनियन समवेत विविध विकास कामे संदर्भात उद्भवणाऱ्या समस्या व अडीअडचणी यावर उपाय योजना संदर्भाने सकारात्मक प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.सर्वस्तरावरून ग्रामसेवक संवर्गाला विकास कामांमधे येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी मदत करू असे आश्वासन खामकर यांनी यूनियनला दिले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासकीय विविध योजना यशस्वीरित्या राबविणे करिता ग्रामसेवक यूनियन कटिबद्ध असल्याचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी आश्वत केले. सदर शिष्टमंडळ मध्ये कार्तिक चव्हाण मानद अध्यक्ष, कमलेश बिसेन जिल्हाध्यक्ष /विभागीय सचिव, कुलदीप कापगते सरचिटणीस,सुरेश वाघमारे कौन्सिलर, ओ. ज़ी. बिसेन, रामा जमाईवार प्रसिद्धी प्रमुख, निशिकांत मेश्राम उपस्थित होते..