सडक अर्जुनी::–तालुक्यातील आदिवासी विविध कार्य. सह. संस्था खजरी येथे खरीप हंगामातील खरेदी केलेल्या धान पैकी 7738 पोती / कट्टे गोदामात पडलेले असून त्या धानाची उचल महामंडळाने आतापर्यंत केली नाही. महामंडळा कडून दिलेल्या पत्रानुसार ज्या संस्थे कडे स्वतः च्या मालकीचे गोदाम आहे त्यांनी धान खरेदी केंद्र सुरु करावे. उघडयावर धान खरेदी केंद्र सुरु करू नये,असे उपप्रादेशिक कार्यलय नवेगावंबांध यांचे दि 31मे 2022 च्या पत्रात असे निर्देश आहे. धान खरेदीची मुदत 15 जून 2022 असून आता पर्यंत धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही.शासन निर्णयात दिलेल्या व वरीष्ट कार्यलयाकडील निर्देशां नुसार धान खरेदी केंद्र त्वरित सुरु करावी असे नमूद आहे. मात्र खजरी संस्थेतील धान अद्याप उचल केला नसल्याने संस्थे ची पिळवणूक होत आहे व शेतकऱ्याचे हित जोपासणे कठीण झाले आहे. खजरी येथील संस्थेत धान खरेदी ची मर्यादा 10 हजार क्विंटल ठरवून दिलेली आहे. मात्र मागील वर्षी सन 2021 मध्ये संस्थेने 28 हजार क्वीटल धान खरेदी केली होती. त्यामुळे दिलेले उद्दिष्टा नुसार धान खरेदी कसा करावे असा प्रश्न पडला आहे.एकी कडे प्रतिहेक्टरी 43 क्विटंल व एकरी 16 क्विंटल धान खरेदी करण्याचे निर्देश आहेत त्या
मुळे शेतकरी गोंधडून गेले आहेत. धान खरेदी केंद्र सुरु करण्यात वेळ लागत असल्याने शेतकरी पडल्या भावात व्यापाऱ्यांना धान विकत आहे. त्यांना खुप तोटा सहन करावा लागत आहे. करिता शासना ने धान खरेदी केंद्राना धान खरेदी ची मर्यादा वाढवून देऊन संस्थेची व शेतकऱ्याची पिळवणूक व गळचेपी करू नये . शेतकऱ्यांची पिळवणूक न करता त्वरीत धान खरेदी केन्द्र सुरू करण्याची मागणी जिवनबापू राऊत अध्यक्ष आदिवासी.विविध कार्य. सह संस्था खजरी यांनी केली आहे.