नवेगावबांध ,जिल्हा न्यायालय व वाशिम न्यायालयात जागतिक योग दिवस साजरा

0
12

सडक अर्जुनी::--नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान वनपरिक्षेत्र अंतर्गत आज दि. २१/६/२०२२ रोजी सकाळी ६ वाजे “जागतिक योग दिवस” निमित्त एक दिवसीय योग शिबीर कार्यक्रम स्वागत संकुल परिसरात आयोजित करण्यात आले.योग शिबीर कार्यक्रमारिता परिक्षेत्रातील एकुण ५१ अधिकारी व वन कर्मचारी सहभागी झाले होते.योग शिबीर प्रशिक्षक लिल्हारे सर नवोदय विद्यालय नवेगावबांध यांचे मार्गदर्शनात यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.योग शिबीरात लाभलेले प्रमुख अतिथी दादा राऊत प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी वन आगार नवेगावबांध, तसेच कार्यक्रमाचे आयोजक सचिन मु. डोंगरवार वनपरिक्षेत्र अधिकारी पार्क व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान,पार्क,वनआगार वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे) वनक्षेत्रातील वनकर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा न्यायालयात योग दिन साजरा

गोंदिया, दि 21: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे व उच्च न्यायालय, मुंबई यांचे कडून प्राप्त झालेल्या निर्देशान्वये जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया व वकील संघ गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानाने 21 जून 2022 रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. व्ही.पी. पाटकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमात सर्वप्रथम जागतिक योग दिनानिमित्त भारत सरकारतर्फे आयोजित कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपस्थितांना दाखविण्यात आले. त्यानंतर सदर कार्यक्रमात योग मार्गदर्शक दर्शनाचार्य योगाचार्य नरेंद्रजी आर्य यांचेकडून उपस्थित न्यायिक अधिकारी/कर्मचारी वृंद तसेच सर्व वकील वर्ग यांनी योग प्रशिक्षण घेतले.

सदर योग शिबिरात ए. एम.खान जिल्हा न्यायाधीश-1 एन.डी.खोसे तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 गोंदिया, एन. बी.लवटे तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 गोंदिया, एस. व्ही.पिंपळे सचिव, जि. वि. से.प्रा.गोंदिया, आर. एम.कानडे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, गोंदिया एस.आर.मोकाशे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, गोंदिया व्ही.ए. अवघडे, एन. बी. कुडते वाय.जे.तांबोली  एस.डी. वाघमारे, सह दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर, गोंदिया तसेच वकील सि.के.बडे अध्यक्ष जिल्हा वकील संघ गोंदिया वकील एस. आर. बोरकर सचिव जिल्हा वकील संघ गोंदिया हे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन एस. आर.मोकाशे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, गोंदिया यांनी तर आभार प्रदर्शन एच.डी. वाघमारे,6 वे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर गोंदिया यांनी केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया व जिल्हा न्यायालय गोंदिया येथील कर्मचारी आर. जे. ठाकरे अधीक्षक एम.पी. पटले सहा. अधीक्षक एन. बी. कांबळे, सिस्टम ऑफिसर (जि. न्या.,गोंदिया) ए.एम.गजापुरे,वरिष्ठ लिपिक, वरजूरकर कनिष्ठ लिपिक सचिन एम. कठाणे पी. एन. गजभिये एच.डी.गेडाम, कनिष्ठ लिपिक बी.डब्लू. पारधी, शिपाई तसेच सर्व जिल्हा न्यायालय, गोंदिया येथील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

वाशिम येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा 

वाशिम दि.२१– जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद,वाशिम यांच्या संयुक्त वतीने ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज २१ जून रोजी वाटाणे लॉन येथे उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला आमदार ऍड. किरणराव सरनाईक,जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार,जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विजय काळबांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कोरे,शिक्षणाधिकारी (माध्यमिक),रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेंद्र शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व वाटाणे लॉनचे संचालक श्री.वाटाणे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
         उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्रीमती पंत यांनी योग दिनानिमित्त प्रतिज्ञा वाचन केले. यावेळी योग प्रशिक्षक डॉ. अर्चना मेहकरकर,तेजस्विनी माणिकराव आणि आशिष जामकर यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व विशद करून विविध योगासने शिकवून उपस्थितांकडून करून घेतली. योगादरम्यान मानेचे व्यायाम,वृक्षासन,पादहस्तासन,अर्धचक्रासन,त्रिगुणासन,जेवणानंतर त्वरित करता येणारे व जेवण पचविण्यास मदत करणारे वज्रासन, श्वसन तंत्र सुधारण्यासाठी दंडासन, भद्रासन, पचनसंस्था सुधारण्यासाठी अर्धंउष्ट्रासन,शशांकासन,मण्डुकासन, दंडासन,वक्रासन,भुजंगासन, शलभासन,सेतुबंधासन,उत्तपादासन, कपालभारती,अनुलोम-विलोम प्राणायाम,शीतली प्राणायाम,भ्रामरी प्राणायाम,अर्धहलासन,पवनमुक्तासन आणि परिश्रमानंतर करावयाचे आसन म्हणजे शवासन आदी आसने व योगासने योग प्रशिक्षकांनी उपस्थितांकडून करून घेतली.
              योग दिनाच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयाचे,विविध विभागाचे व जिल्हा परिषदेचे अधिकारी – कर्मचारी,माऊंट कारमेल शाळेचे विद्यार्थी,सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,शिक्षक व युवक-युवतींनी सहभाग घेतला.संचालन दिलीप जोशी यांनी केले. उपस्थितांचे आभार राजेश शिंदे यांनी मानले.