
गोंदिया,दि.24ः गोंदिया जिल्हा परिषद पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एकता पॅनलच्या 21 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज जिल्हा निबंधक व निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले.यावेळी एकता पॅनलच्या समर्थनात जिल्ह्यातील ३०० वर सभासदांनी उपस्थिती दर्शवली होती.या पतसंस्थेवर सुरवातीपासूनच एकता पॅनेलचे वर्चस्व आहे.यावेळी सुध्दा एकता पॅनलने पतसंस्था आपल्या ताब्यात कशी राहिल याची व्युवरचना आखायला सुरवात केली आहे.या निवडणुकीसाठी एकता पॅनलच्या वतीने सचिव पदाकरीता गुणवंत ठाकूर,अनु.जमाती गटातून अजय वासनिक,विजाभज/विमाप्र गटातून अमोल डेकाटे,इतर मागासवर्ग गटातून संजय बनकर,महिला प्रतिनिधी मंजुषा चौधरी,माधुरी टेंभुरकर,रंजना रोकडे,वर्ग 4 महिला गटातून ममता कुंभलकर,वर्ग 4 गटातून नामदेव मेश्राम,पंचायत समिती गोंदिया गटातून रविकुमार पटले,महेंद्र खोब्रागडे,पंचायत समिती तिराेडा गटातून अनमोल चव्हाण,गजानन माहुरे,आमगाव-महेश पटले,सालेकसा-अशोक फुंडे,देवरी-आत्माराम वंजारी,अर्जुुनी मोरगाव नुरेशगिरी भारव्दाज,सडक अर्जुनी-किशोर बनसोड,गोरेगाव-शशीकांत बावनकर व जिल्हा परिषद गटातून अनमोल मेश्राम,चंद्रकांत धपाडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.




