जि.प.उपाध्यक्ष गणवीर आरोग्य व शिक्षण,टेंभरे अर्थ/बांधकाम तर कुथेकडे कृषी व पशुसंवर्धन

0
128

गोंदिया,दि.24ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या आज 24 जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांनी विषय समिती सभापतींच्या खातेवाटपाची घोषणा केली.विशेष म्हणजे सभापतीपदी निवड झाल्यानंतर तब्बल एक महिन्यांनी हे खाते वाटप झाले असून जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणवीर यांच्याकडे आरोग्य व शिक्षण विभागाचे सभापती पद देण्यात आले.तर संजय टेंभरे यांना अर्थ व बांधकाम विषय समितीचे सभापती पद देण्यात आले आहे.सोनु कुथे यांंच्याकडे कृषी व पशुसंवर्धन विषय समितीचे सभापती देण्यात आले आहे.विशेष म्हणजे टेंभरे यांना अर्थ व बांधकाम विषय समिती न देण्यावर भाजपच्या नेत्यांचे मत होते,त्यावरुनच 7 जून रोजीची पहिली सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली होती.आज मात्र अखेर टेंभरे यांच्याकडेच सदर विषय समितीचे सभापतीपद गेल्याने चर्चेतील विषय संपुष्ठात आला असला तरी मनात निर्माण झालेले मतभेद व मनभेद हे अडीचवर्ष कायम राहतील अशी चर्चा आहे.विषय समितीच्या सभापतीपदासोबतच विषय समिती सदस्यांचीही निवड आजच्या बैठकीत करण्यात आली आहे.