संपुर्ण गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त जाहिर करा-आमदार अग्रवाल

0
144

गोंदिया,दि.25ः- गोंदिया जिल्ह्यातील काही मोजकेच तालुके नक्षलग्रस्त असल्याचे सरकारने जाहिर केले होते.त्यावर गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र देत संपुर्ण गोंदिया जिल्ह्याच नक्षलग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली होती.त्या पत्राची दखल गृहमंत्री वळसे पाटील यांनी घेत आमदार अग्रवाल यांचे सदर पत्र गृहविभागाच्या उपसचिवांना कारवाईच्या संदर्भाने पाठविले आहे.