आमदारांची संयुक्त विक्री केंद्राला भेट

0
7

तिरोडा दि.१९: महाराष्ट्र शासन कृषी विभागद्वारा मान्यताप्राप्त शेतकर्‍यांच्या शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विक्री केंद्रात पोहोचविण्याचे काम सुरु केले आहे. याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यामध्ये शेतकरीबांधवांना उत्पादीत मालास योग्य भाव मिळत असून ग्राहकांना सुद्धा कमी दरात उत्तम दर्जाच्या फळभाज्या मिळत आहे. या केंद्राला आमदार विजय रहांगडाले यांनी भेट दिली व इतर शेतकर्‍यांनी सुद्धा धान पिकावर न अवलंबून राहता फळभाज्याचे उत्पादन घेऊन आपल्या आर्थिक विकास साधावा असे आवाहन केले. संयुक्त शेतीचे उत्कृष्ट उदाहरण समाजात विठ्ठल पटले, हरिणखेडे आदी शेतकर्‍यांनी दिले आहे. याचे अनुकरण इतर शेतकर्‍यांनी करावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.