सिरेगांवबांध येथे रोगनिदान शिबीर आज

0
15

अर्जुनी मोर. :--महात्मा गांधी यांची जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा पंधरवाडा निमीत्य भाजपा ओबीसी मोर्चाचे वतीने ऑरियश हाॅस्पीटल नागपुर यांचे पुढाकाराने अर्जुनी मोर तालुक्यातील सिरेगांवबांध येथे २० सप्टेंबर २०२२ रोज मंगळवारला रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोग निदान शिबीरात सर्व रोगाचे निदान आणी त्याकरिता मार्गदर्शन, नेत्र तपासणी करुन माफक दरात चष्म्याचे वाटप केले जाणार आहे. या शिबीरात ऑरियश हाॅस्पीटल नागपुर चे डाॅ. शैलेश बागडे आणी त्यांची चमू तपासणी करून उपचार व मार्गदर्शन करणार आहेत. या रोग निदान शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस चामेश्वर गहाणे यांनी केले आहे.