कोदामेढी येथे ये-जा करणाऱ्या मार्गाची दुरावस्था

0
40

सडक अर्जुनी:::–तालुक्यातील कोदामेढी गाव माजी मंत्री यांचे गाव असून विकासापासून कोसो दूर आहे.या गावाला ये-जा करणाऱ्या मार्गाची दुरावस्था झाली आहे.या दुरावस्था झालेल्या मार्गाची दुरूस्ती करण्यासाठी या क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रीकापूरे लक्ष देतील का? अशी परिसरातील विद्यार्थी व नागरिकांचे म्हणणे आहे.
तालुक्यातील कोदामेढी गावालगत उमरझरी नाला वाहत जातो.त्याला लागून क्रिडा संकुल बांधलेला असून कोदामेढी ते सडक अर्जुनी एक किमी.कमी लांबीच्या असलेल्या पादचारी मार्गावर पुल तयार करण्यात आला होता. शाळकरी मुले, अंगणवाडीतील बालके व गावकरी या पादचारी पुलावरून ये-जा करीत होते.पण यावर्षी पावसाळ्यात पुलाला तळा जाऊन कोदामेढीच्या बाजूने पुलाचे काठाजवळील माती निघून ५ ते ६ फुट खड्डा पडला असून व पुलाचे काही भाग तुटल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन पुलाचे बाजूने ये-जा करावी लागते.त्यामुळे एखादं वेळी मोठी दुर्घटना रात्री-बेरात्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पण याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग सडक अर्जुनी यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.तीन वर्ष आधी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पुलाचे दुरुस्तीचे काम केले होते.पण अधिकारी व कंत्राटदार यांचे संगनमताने पैसा वाचविण्यासाठी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने प्रत्येक वर्षी पादचारी पुलाच्या दोन्ही कडेला असलेल्या भिंती तुटून पडत आहेत.त्यावरून हे काम किती मजबूत झाले हे सिद्ध होते.या पादचारी पुलावरून सिंदीपार,मुंडीपार,घाटबोरी कोहळी,घाटबोरी तेली,फुलेनगर,बौध्दनगर या गावातील नागरिक विद्यार्थी तालुक्याला व शाळेत जाण्यासाठी या मार्गाचा जास्त उपयोग करतात.विशेष म्हणजे,कोदामेढी ते वडेगाव ३ किमी.सडक अर्जुनी एक किमी.असे एकुण ४ किमी लांब न जाता या मार्गाने ये-जा करीत असतात.