घरकुलांपासून विधवा महिला १५ वर्षांपासून वंचित

0
36

सडक अर्जुनी::—तालुक्यातील खोडशिवनी येथील निराधार विधवा महिला सुंगधा शामराव गजबे ही गरजू लाभार्थी असून १५ वर्षांपासून घरकुलाची आस लावून आहे.मात्र अजूनही घरकुल मिळाले नसून घरकुलाचे योजना पासून वंचित आहे.सदर विधवा महिलेला घरकुलाचा लाभ मिळावा याकरिता सन२००८ पासून ग्रा.प. ला मागणी करीत आहे.पण आजपावेतो या महिलेला घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यास ग्रामपंचायतला यश आले नाही.ग्रामपंचायत पदाधिकारी यांना विचारणा केली असता,तुझे नाव घरकुलासाठी पंचायत समिती कडे पाठविले आहे असे सांगून मोकळे होतात.
सदर विधवा महिला आजही जिर्ण झालेल्या पडक्या घरात जीव धोक्यात घालून वास्तव्य करीत आहे.दोन-तीन पिढ्यांपासून असलेले घर रोडाचे उंचीनुसार बसल्याने पावसाळ्यात पाणी घरात साचते.या विधवा महिलेला संजय गांधी निराधार योजना चे १००० रुपये मिळतात. त्यावर ती आपला उदरनिर्वाह चालवत आहे.त्यातच ५ वर्षांपासून घरावर ४-५ हजार रुपयांची ताटपत्री टाकून कशीबशी वेळ काढत आहे.एकीकडे गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ न मिळता सधन व गरज नाही ,अतिक्रमण केलेले व बाहेर गावाहून आलेल्या लोकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो.मात्र गरजू व पडक्या घरात वास्तव्य करणाऱ्या लोकांना घरकुलाचा लाभ मिळत नाही.आजही सदर विधवा महिला घरकुल मिळेल या आशेवर जीवन जगत आहे.पण या विधवेला घरकुलाचा लाभ केव्हा मिळणार.
विशेष म्हणजे, केंद्र व राज्य शासनाचे धोरणानुसार सन २०१९ ते २०२२ पर्यंत गरजूंना घर व अति आवश्यक लोकांचे प्रपत्र “ड” यादीत नाव समाविष्ट करून प्रथम लाभ देण्याचा अधिकार असूनसुद्धा ग्रामपंचायतने वाढीव कुटुंब दाखवून त्यांना लाभ दिल्याचे विधवा महिलेचे व नागरिकांचे म्हणणे आहे.