गाडगेबाबांची दशसूत्री तत्काळ लावा – विविध संघटनांचा आक्रोश

0
14

जिल्हाधिकारी मार्फेत पाठवले निवेदन
यवतमाळ,दि.03ः- राज्य सरकारने मंत्रालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात आलेली गाडगेबाबांचे तैलचित्र आणि दशसूत्री काढल्याच्या निषेधार्थ यवतमाळातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत तीव्र आंदोलनाचा इशारा आज(दि.03) निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे .
भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन नई दिल्ली, ओबीसी जन मोर्चा, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संभाजी ब्रिगेड, सावित्रीबाई फुले महिला मंडळ व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आपल्या तीव्र भावना राज्य सरकारला कळविण्याची विनंती केली.
याप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर गोरे , विलास काळे, संतोष झेंडे, रमेश गिरोळकर, ज्ञानेश्वर रायमल, अशोक मोहुर्ले, प्रा. सविता हजारे , शशिकांत फेडर , राहुल सारवे , सचिन साखरकर, माधवी चिंचोळकर , सुरज खोब्रागडे, अजय ढोबे, दीपक काळे , बबनराव सुखसोहळे, राम घोटेकर, मृणाल बिहाडे ,श्रीकांत निवल आदि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.