देवरीच्या ग्रामीण रूग्णालयात भव्य दंत व वैद्यकिय शिबीर संपन्न

0
17

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शिबीराचे आयोजन.

देवरी,ता.०४:  शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत देवरीच्या ग्रामीण रूग्णालयात गेल्या गुरूवारी भव्य दंत व वैद्यकिय शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सहसराम कोरोटे हे होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे गटनेते

संदिप भाटिया, जि.प.सदस्य उषाताई शहारे, राधिकाताई धरमगुळे, कल्पनाताई वालोदे, कांग्रेसचे जिल्हा महासचिव बळीराम कोटवार, देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके, उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. आनंद गजभिये, जैपाल प्रधान, यांच्यासह तालुक्यातील सर्व वैद्यकिय यंत्रणा व परिसरातील नागरिक महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.