पटोलेंचे टीकास्त्र:म्हणाले- राहुल गांधी पायी फिरत गळाभेट घेतात, मोदींच्या कार्यक्रमाला कॅरेक्टर सर्टीफिकेट लागते

0
48

एकीकडे राहुल गांधी देशभर सामान्यांची गळाभेट घेत पायी फिरत आहेत. तर दुसरीकडे सामान्य माणसांना भेटणे तर सोडाच; पण आता पत्रकारांनासुद्धा पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी ‘कॅरेक्टर सर्टिफिकेट’ द्यावे लागणार! लोकनेता आणि अहंकारी नेता यांतील हा फरक आहे, अशी जोरदार टीका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज ट्विटद्वारे केली.

काय आहे ट्विट?

नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकदिवसीय हिमाचल प्रदेश दौऱ्याचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांकडून चारित्र्य प्रमाणपत्र मागणारी नोटीस प्रशासनाने जारी केले होते. यासह भारत जोडो यात्रेवर भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी प्रखर प्रत्युत्तर दिले. त्यावर त्यांनी राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांचा जनतेतील समन्वयाबाबत तुलना करीत ट्विट करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले.

ते नोटीफिकेशन मागे

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकदिवसीय हिमाचल प्रदेश दौऱ्याचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांकडून चारित्र्य प्रमाणपत्र मागणारी नोटीस प्रशासनाने जारी केले होते. आज मागे घेतली, त्यामुळे पत्रकारांमध्ये रोष निर्माण झाला. 29 सप्टेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात सर्व पत्रकार, छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर यांची यादी मागवली होती. यासोबतच त्याचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रही मागविण्यात आले होते.

सरकारी दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या पत्रकारांनाही त्याचे पालन करावे लागले. अधिसूचनेत म्हटले आहे की पत्रकारांना 1 ऑक्टोबरपर्यंत प्रमाणपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. “रॅली किंवा सभेत त्यांचा प्रवेश या कार्यालयाद्वारे निश्चित केला जाईल,” असे अधिसूचनेत म्हटले आहे.

चित्त्यावरुन पुन्हा टीकास्त्र

नाना पटोले यांनी पंतप्रधानांनी मध्यप्रदेशातील राष्ट्रीय अभयारण्यात चित्ते आणून ते तेथे सोडले होते. त्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. त्यानंतर नाना पटोलेंनीही टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर पुन्हा पटोले यांनी चित्ते आणल्यामुळेच देशात लम्पी व्हायरस पसरला असा आरोप करीत केंद्राच्या धोरणावरही टीका केली