शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरसकट रुपये 1500 प्रोत्साहन भत्ता लागू

0
22

गोंदिया-जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय दिला.सोबतच याकरीता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहागंडाले यांनी केलेले सहकार्य महत्वाचे ठरल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाच्यावतीने आज जि.प.अध्यक्ष रहागंडाले यांचा सरसकट प्रोत्साहन भत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
एकस्तर वेतनश्रेणीच्या अभूतपूर्व यशानंतर गोंदिया जिल्ह्यातील बऱ्याच शिक्षकांच्या मागणी नुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाने गोंदिया जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट रुपये 1500 प्रोत्साहन भत्त्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
वेळोवेळी निवेदने व शिष्टमंडळ भेट घेण्यात आली. दिनांक 22 मार्च 2022 ला जिल्हापरिषदेसमोर संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.त्यावेळी शिष्टमंडळ भेटीत प्रोत्साहन भत्त्याची जोरदार मागणी संघाने लावून धरली. परंतु पुढे यश मिळत नसल्याचे पाहून विभागीय चौकशी उपायुक्त मंजुश्री ठवकर यांची भेट घेत त्यांना शिक्षक संघाच्यावतीने सविस्तर माहिती देण्यात आली.त्यानंतर उपायुक्त श्रीमती ठवकर यांनी प्रोत्साहन भत्ता संबंधी निर्णय घेण्यासबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुचना केल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने  जिल्हा परिषदेच्या सामान्य सभेमध्ये प्रोत्साहन भत्ता देण्यासंबंधी ठराव ठेवण्याकरीता पाठपुरावा केल्यानंतर तो ठराव घेण्यात आला.त्यानुसार जिल्हा प्रशासन प्रोत्साहन भत्ता देण्यासंबंधी कामाला लागले.सरसकट प्रोत्साहन भत्त्यासह शिक्षाकांच्या सर्व मागण्या पूर्ण करा अन्यथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ दिनांक 10/09/2022 पासून साखळी उपोषण करण्याच्या तयारीत असल्याचे जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले यांना सांगण्यात आले.त्यावर जि.प.अध्यक्ष रहांगडाले यांनी सीईओ अनिल पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करीत सदर प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले होते.जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अशोक बागडे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे वरीष्ठ सहाय्यक यदनेश्वर मानापुरे,शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष नूतन बांगरे, जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध मेश्राम, गोंदिया तालुका अध्यक्ष वाय डी पटले, सडक अर्जुनीचे तालुका सरचिटणीस किशोर बावणकर यांनी एकत्रितपणे भेट घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा करून जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता रुपये 1500 चा मुद्धा निकाली काढला.
त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करून संघाने सर्वांना न्याय मिळवून दिला.तसेच जि प अध्यक्ष पंकज रहांगडाले, जि प उपाध्यक्ष यशवंत गणवीर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील,नरेश भांडारकर उप मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधीकारी डॉ. महेंद्र गजभिये यांचे संघाच्या वतीने हार्दीक अभिननंदन करण्यात आले.नूतन भाऊ बांगरे विभागिय अध्यक्ष,विरेंद्र कटरे जिल्हाध्यक्ष,अनिरुद्ध मेश्राम जिल्हा सरचिटणीस केदार गोटेफोडे जिल्हा संघटक हेमंत पटले, शंकर चौहान, वाय डी पटले,मोरेश्वर बडवाईक,किशोर बावनकर, चंद्रशेखर दमाहे, चंदू दुर्गे,मुनेश्वर जैतवार,संतोष टेम्भरे,रमेश बिसेन,जि एन बेगड,एच जि तुरकर,लक्ष्मण आंधळे,जि एस ठुले,सचिन राठोडं, अरविंद उके,रमेश संग्रामे, आदी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.