शशिकरण देवस्थानात महायात्रेचे आयोजन;दोन वर्षानंतर यात्रा

0
22

सडक अर्जुनी = राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर सुमारे २०० वर्ष पुरातन शशीकारण मंदिरात नवरात्र उत्साह निमित्त अखंड ज्योती प्रज्वलीत करून दि. ३/१०/२०२२ ला भव्य यात्रेचे आयोजन योगिराज धूनीवाले बाबा सेवा ट्रस्ट डूग्गिपार देवपयलीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.अखंड ज्योतीचे दर्शन करुन अष्टमीच्या हवनाचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . पुरातन काळातील हे आदिवासी समाजाचे आराध्या दैवत आहे .
या यात्रेत लाखोच्या संख्येने श्रध्दाळू भाविक उपस्थित होते. डुग्गीपार पोलीस स्टेशन चे ठाणेदार सचिन वांगळे यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त लावला होता. सदर यात्रा महामार्गाला लागून मंदिर असल्यामुळे महामार्गावरच भरत असते . महामार्गाचे काम सुरू असतांना सुद्धा यात्रा सुटसुटित भरवण्यात आली होती.
७० वर्षा अगोदर रामसिंह ठाकुर , बापू ठाकुर हे असताना या मंदिरात पांढऱ्या रंगाचा वाघ निघायचा अशी आख्यायिका आहे. भाविकांना दर्शन द्यायचा असे आजही नागरिक सांगतात. या कार्यक्रमाकरिता अग्रवाल कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रमोद पांडे, पत्रकार भामा चु-हे , मुन्ना ठाकूर, किशोर डोंगरावार,डूडीस्वर लांजेवार, राकेश नंदागवली, चंद्रमणी बंसोड, योगीराज धूनीवाले बाबा सेवा ट्रस्टचे सचिव देवीदास कोवे,राधेश्याम कांबळे आदी उपस्थित होते.
शशिकरण देवस्थानात मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सवात पहिल्या सोमवारी यात्रेचे आयोजन केले जाते.परंतू या देवस्थात परिसराचा पाहिजे तसा विकास झाला नाही.या देवस्थान परिसराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही.शशिकरण मंदिरापासून १००मी. अंतरावर वाघाची कप्पी असून भाविक लोक वाघाची कप्पी पाहायला आवर्जून जातात. या ठिकाणाहून सडक अर्जुनी तहसिल कार्यालय व पंचायत समिती परिसर व बाजू बाजूच्या गावांचा नयनरम्य परिसर दिसतो .