विविध विकासकामांचे आमदार चंद्रीकापूरे यांचे हस्ते भुमीपुजन व लोकार्पण

0
20

सडक अर्जुनी::- तालुक्यातील पांढरी जिल्हा परिषद क्षेत्रांतंर्गत ता.४ आंक्टोंबर रोजी अर्जुनी/मोर विधान सभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते विविध गाव-विकासात्मक कामांचे भुमीपुजन करण्यात आले.
रेंगेपार येथे २५-१५ निधीअंतर्गत १० लाखांचे सिमेंट रस्ता , हलबीटोला/पांढरी येथे २५-१५ निधीतुन १०लाखांचे सिमेंट रस्ता बांधकाम तसेच ८ लाखांचे कब्रस्तान कंपाऊंड वांल, डुंडा येथे ५ लाखांचे बौद्ध विहार सभामंडप ,बकिटोला येथे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे निधीअंतर्गत १० लाखांचे सिमेंट रस्ता बांधकाम,गोंगले येथे २५-१५ निधीअंतर्गत काल्हादेव मंदिर परिसरा सामोर १०लाखांचे चे सिमेंट रस्ता बांधकाम, तसेच काल्हादेव मंदिर परिसरात १० लाखांचे सभामंडप,
खाडीपार येथे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निधीतून ५ लाखांचे सिमेंट रस्ता बांधकाम तसेच १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत १२ लाख रुपयांचे ग्राम पंचायत भवन निर्माण होणार आहे. असे एकुन ८० लाख रुपये कामांचे भुमीपुजण करण्यात आले.
तसेच गोंगले येथे ९लाख ४० हजार च्या आंगणवाडी भवनाचा लोकार्पण आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते पार पडला.
त्याप्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा महासचिव इंजी.डि.यू.रहांगडाले, राष्ट्रवादी तालूका अध्यक्ष डाॅ.अविनाश काशीवार, पंचायत समीती सभापती संगीताताई खोब्रागडे,जिल्हा परिषद सदस्या सुधाताई रहांगडाले, को-आपरेटिव्ह बंक संचालक गजानन परशुरामपुर,रेंगेपार चे सरपंच गुलाब तोंडफोडे, उपसरपंच निरज मेश्राम,पांढरी चे सरपंच रामलाल नाईक, उपसरपंच मनोहर बागडकर, सल्लु पठान,निलाताई ढोरे, ग्राम विस्तार अधिकारी बि.यू.हुड,ग्रामसेवक संदिप मेंढे, अभीयंता राजेश पटले,माधव हटवार,सुरेश पटले,प्यारेलाल रहांगडाले,तुलशी बिसेन,मदन येडे,पुरणलाल रहांगडाले,वाघमारे,प्रशांत येडे,चंद्रभान राऊत बाबु, दिना कटरे,हेमराज वरकडे,दादु परशुरामपुर,होमेश्वर कापगते, खाडीपार चे सरपंच योगराज मसराम,प्रविण अंबुले,सौ.भारती कटरे,केशव धनपाते,प्रदिप पारधी,प्रकाश भोंडे,व मोठ्या संख्येने गावकरी प्रामुख्याने हजर होते.