बिहीरीया येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0
26

परसवाडा : जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत 5054 जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत सिमेंट रस्ता बाधंकाम बिहीरीया ते चांदोरी खु. व गाव अतंर्गत रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य चत्रभुज बिसेन होते. याप्रसंगी प्रामुख्याने पंस उपसभापती हुपराज जमईवार, संरपच मदन पटले, उपसंरपच गणेश मेश्राम, विरेंद्र मेश्राम, शिवचरण अंबुले, उमाशंकर जमईवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक मेश्राम, सर्व नागरिक उपस्थित होते.