कोसबी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ;नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी

0
32

सडक अर्जुनी::-–वनक्षेत्र सहाय्यक कोहमारा अंतर्गत येणाऱ्या कोसबी, कोल्हारगाव ,बकी, मेंडकी या परिसरात बिबट्याच्या धुमाकूळ घातल्यामुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मागील गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याच्या धुमाकूळ असल्यामुळे काही शेतकऱ्यांची कोंबडे ,बकरे तर गाईचे वासरं खाऊन फस्त केल्याची माहिती पुढे आली आहे.त्यात कोसंबी येथील सुदर्शन गहाणे, अमूल गहाणे ,ओमप्रकाश गहाणे, कामेश गहाणे, सुनील गहाणे ,उपदेश गहाणे ,मुखरू नेवारे, शामराव भोयर, भागू भोयर ,राधेश्याम भोयर, यांच्या कोंबड्या, बकऱ्या तर काहींचे गाईचे वासरे खाल्ल्याची माहिती आहे.
सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव यांनी लक्ष देऊन गावकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गोरगरीब शेतकरी शेतमजुरांनी केली आहे.
तो बिबट्या रात्री रस्त्याने फिरत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. वनविभागाच्या सतर्कतेमुळे ठिकठिकाणी कॅमेरे लावून ठेवले आहेत , काही कॅमेरात बिबट्या कोंबडा घेऊन जात असताना टिपले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे कोसंबी गावात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात येणार आहेत . बिबट्याच्या धुमाकूळ असल्यामुळे गरीब शेतकऱ्यांच्या कोंबड्या, बकऱ्या व वासरे खाल्ल्याची माहिती खरी आहे. त्यांचा पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.आनंद बनसोड,वनरक्षक ,कोहमारा