गोंदिया येथील जैनकलार समाज भावनातील वास्तूपूजन थाटात

0
24

गोंदिया,दि.10- जैनकलार समाजातील दानदात्यांकडून गोळा झालेल्या वर्गणीतून बांधण्यात आलेल्या 8 खोल्यांचे वास्तूपूजन मोठ्या थाटात गोंदिया येथे काल रविवारी शरद पौर्णिमेचे औचित्य साधत पार पडले.

स्थानिक जैन कलार सांस्क़तिक भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळ दान दातदाते जिल्हाध्यक्ष एल यु खोब्रागडे, सचिव शालिकराम लिचडे, माजी सचिव महेंद्र सोनवाने, माजी कोषाध्यक्ष भैयालाल मोरघडे, माजी अध्यक्ष असोक लिचडे, हरिराम भांडारकर, दिगंबर लिचडे, परमेश्वर लिचडे आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजाचे ऋण सर्वांनीच फेडले पाहिजे, या भावनेतून जैन कलार समाजातील दान दात्यांनी प्रत्येकी एक खोली बांधून समाजहितासाठी समर्पित केली. या खोल्यांच्या समाजबांधवांना मोठा भविष्यात मोठा लाभ होणार आहे. शरद पौर्णिमेचे औचित्य साधत या नवनिर्मित खोल्यांचे वास्तूपुजन काल थाटात करण्यात आले.

यावेळी सुखराम खोब्रागडे, यशोधरा सोनवाने, तेजराम मोरघडे. उमेश भांडारकर,शोभेलाल दहिकर,मनोज किरणापुरे प्रदीप आष्टीकर,लता खोब्रागडे, प्राजक्ता रणदीवे,मिनाक्षी रहमतकर, विना सोनवाने, वासू सोनवाने,मनोज भांडारकर, रोशन दहिकर,नामदेव सोनवाने, देवानंद भांडारकर,आदी  मान्यवरांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.